शिवाजी महाराज सर्वसमावेशक, सहिष्णू राजे – सचिन साठे

चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

पिपंरी – चिंचवड : चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आज शिवजयंती निमित्ताने सांगवी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

आपले मनोगत व्यक्त करताना सचिन साठे म्हणाले युगपुरुष, हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हा तर त्यांचा मोठेपणा आहेच परंतु त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि अक्षरश: मूठभर सहकार्‍यांच्या मदतीने ते इतिहासदत्त कार्य केले. असे करण्यासाठी लागणारी धीरोदात्त वृत्ती, संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते म्हणूनच हे शक्य झाले. त्यांच्या अंगी असलेल्या या गुणांचा अभ्यास, विश्लेषण आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे.शिवाजी महाराज सर्वसमावेशक, सहिष्णू राजे होते. शौर्याचे प्रतीक असलेले शिवाजी महाराजांचा आदर्श व प्रेरणा घेऊन सर्वांनी काम करण्याची गरज आहे. असे मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, कुंदन कसबे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, शहर काँग्रेस उपाध्यक्ष अनिरुध्द कांबळे, मोहन अडसूळ, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष संदेश बोर्डे शहर युवक काँग्रेस प्रवक्ते गौरव चौधरी, सरचिटणीस – अनिकेत आरकडे, शफी चौधरी, मयुर रोकडे जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष वासुदेव मालतुमकर बंडोपंत शेळके शेषराव कसबे कृष्णराव गिरगुणे चंद्रकांत शेलार वाघ महाराज पुरुषोत्तम वायकर उपस्थीत होते. दिनकर इंगळे या कार्यक्रमाचे आयोजन कुंदन कसबे यांनी केले.

 641 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.